बीड सह राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड ; आजपासून अग्रीम थेट खात्यावर वर्ग करणं सुरू!
लोकगर्जनान्यूज
बीड : यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम देण्याची शिफारस करण्यात आली. या बाबतीत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश आले असून आजपासून बीड जिल्ह्यासह राज्यातील इतर १६ जिल्ह्यातील ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांना १७०० कोटींचा पीकविमा मिळणार आहे. ही रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या खात्यांवर वर्ग करण्याची कारवाई सुरू झाल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी राज्यात अनेक भागात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला. यामुळे खरीप हंगाम पिकांमध्ये मोठी घट होऊन उत्पादनात तुट आली. यामुळे जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम देण्याची अधिसूचना जारी केली. परंतु याला विमा कंपन्यांनी नकार दिले. हा प्रकार शासनाकडे गेला याला कृषी विभागाने धुडकावून लावत शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम देण्याच्या सूचना करुन विमा कंपन्यांना चांगलाच झटका दिला. यानंतर विमा कंपन्या ताळ्यावर आल्या असून त्या अग्रीम देण्यास तयार झाल्या आहेत. यासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विशेष प्रयत्न करुन शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आहे.बीड जिल्ह्यातील एकूण ७ लाख ७० हजार शेतकऱ्यांना २४१ कोटी रक्कम २५ अग्रीम मंजूर झाले. ही रक्कम दिवाळी पर्यंत सरळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. तसेच यासह पहिल्या टप्प्यात राज्यातील १६ जिल्ह्यातील ३५ लाख ८ हजार शेतकऱ्यांना १ हजार ७०० कोटी रुपये अग्रीम नुकसान भरपाई अहवालानुसार मिळणार आहे. याचे वितरण आजपासून सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. आधीच खरीप गेले अन् पाऊस नसल्याने यब्बीचे काही खरे नाही. अशा स्थितीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना दिवाळी सारख्या सनावेळी ही रक्कम मिळणार असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असे चिन्ह दिसत आहे.