क्राईम

बीड शहरात एलसीबीची मोठी कारवाई; ७६ जणांवर गुन्हा दाखल ७ जणांना अटक

 

बीड : शहरातील सम्राट बियर बारच्या वरील मजल्यावर एलसीबीने मटका बुकीवर छापा मारुन मोबाईल, कॉम्प्युटरसह आदी मटक्याचे साहित्य असा जवळपास २ लाख ३५ हजार ७८० रू. मुद्देमाल जप्त केला आहे. सदरील कारवाई मंगळवारी ( दि. ५ ) करण्यात आली. यामध्ये सात जणांना ताब्यात घेतले असून मटका बुक्की मालक व विविध ठिकाणचे एजंट असे एकूण ७६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.

बीड जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून, याला रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी कारवाईचे आदेश दिले. दरम्यान गुप्त खबऱ्या कडून स्थानिक गुन्हे शाखा ( एलसीबी ) ला माहिती मिळाली की, शहरातील सम्राट बियर बारच्या वरील मजल्यावर मटका बुक्की सुरू असून, काहीजण व्हॉट्सॲपवर कल्याण, मुंबई मटका खेळवित असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छापा मारला असता सदरील ठिकाणी कल्याण मटक्याचे आकडे व्हॉट्सॲप द्वारे घेण्यात येत होते. या छाप्यात एकूण २२ मोबाईल, ३ कॉम्प्युटर प्रिंटर, २ इंटरनेट राउटर, डिव्हीआर, एलइडी, सीसीटीव्हीसह मटक्याचे साहित्य असे एकूण २ लाख ३५ हजार ७८० रु. मुद्देमाल जप्त केला. तसेच ज्ञानेश्वर आसाराम निंबाळकर ( वय 39 वर्षे ) रा.शनिमंदीर गल्ली, बीड, भूषण श्रीपाद दहिवाळ ( वय 24 वर्षे ) रा.पोस्टमन कॉलनी, अंबिका चौक, बीड, शरद सुभाष शिंदे ( वय 38 वर्षे ) रा.सारनाथ कॉलनी, शाहूनगर, बीड, भरत बाबासाहेब जाधव ( वय 34 वर्षे ) रा.माळीगल्ली, अजिजपूरा, बीड, प्रदीप किशोर वाघमारे ( वय 31 वर्षे ) रा.चक्रधरनगर, पांगरी रोड, बीड, हनुमान मनोहर क्षिरसागर ( वय 38 वर्षे ) रा.धानोरा रोड, बीड, अशोक रावसाहेब गव्हाणे ( वय 40 वर्षे ) रा.टाकळगांव ता.गेवराई जि.बीड असे या सात जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता बुकीचे मालक विशाल वसंतराव जाधव रा.पांगरी रोड, सम्राट चौक, बीड, उमेश उर्फ विकी शिवशंकर महाजन रा.क्रांतीनगर, बीड हे असल्याचे सांगितले तर, जिल्ह्यातील विविध भागातून ६७ एजंट कडून मटका घेतोत असे ही सांगितले. यावरून एकूण ७६ जणांवर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. या कारवाईचे सामान्य जनतेतून कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »