बीड शहरात आवाज कशाचा चर्चा; प्रशासनाने सांगितले हे कारण

लोकगर्जनान्यूज
बीड : शहरात साडेआठ वाजण्याच्या सुमारास शहरात मोठा आवाज झाला तर काही ठिकाणी घर हादरा बसवल्याचा अनेकांनी दावा केला. बरेच जण भूकंपाच्या भितीने घराबाहेर पडले होते. यामुळे शहरात फक्त आवाज कशाचा हीच चर्चा आहे. परंतु प्रशासनाने यामागील कारण सांगितले असून घाबरुन जाण्याची गरज नाही.
शहरात गुढ आवाज येताच अनेकांना भुकंपाची शक्यता वाटल्याने शहर वासियांमध्ये काहीशी घबराट पसरली. परंतु बीडचे तहसीलदार सुहास हजारे यांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क केला. जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पोकळी निर्माण होऊन हवेचा दाब वाढल्याने असे आवाज होतात अशी माहिती भूगर्भ शास्त्रज्ञ रोहन पवार यांनी दिली. हा भूकंपाचा आवाज नाही त्यामुळे घाबरुन जाऊ नये असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.