बीड-वडवणी रस्त्यावर कारची दुचाकीला धडक: दुचाकीवरील दोघे ठार; ओळख पटविण्याचे आवाहन
लोकगर्जना न्यूज
बीड : बीड – वडवणी रस्त्यावर कार व दुचाकीची धडक होऊन घडलेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे ठार झाले आहेत. त्यांची अद्याप ओळख पटली नाही. त्यामुळे जर कोणाला काही माहिती असेलतर जिल्हा रुग्णालय बीड येथे माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
समजलेली अधिक माहिती अशी की, बीडच्या दिशेने येत असलेली दुचाकी क्रमांक एम.एच. ४४ इ ९८५२ यास पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील मौज जवळ एका इरटिगा कारने जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोघे ही ठार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बीड येथे जिल्हा रुग्णालयात हलविले आहे. परंतु दुचाकीवरील दोघांचीही अद्याप ओळख पटली नाही. जर याबाबतीत कोणाला काही माहिती असेलतर बीड येथील जिल्हा रुग्णालयात संपर्क करुन माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.