बीड मॅरेथॉन स्पर्धेत मोबाईल चोरांनी केला हात साफ… तब्बल इतके मोबाईल लंपास
बीड : येथील छत्रपती संभाजी राजे क्रीडांगणावर रविवारी ( दि. २६ ) सकाळी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मोबाईल चोरांनी हात साफ करून एक दोन नव्हे तर तब्बल ६ मोबाईल चोरल्याचे समोर आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद झाला.
आमदार विनायक मेटे यांनी “रण फॉर हेल्थ” या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. यासाठी लहान, थोर, तरुण अशा सर्वच बीड करांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे क्रीडांगणावर मोठी गर्दी होती. प्रत्येकजण आरोग्यासाठी धावण्यात मग्न होते. याचा फायदा उचलत चोरांनी हात साफ करत सहा जणांचे मोबाईल चोरले १ ) मोटोरोला जी ४० फ्युजन कंपनीचा मोबाईल, २ ) ओपो ए ५३, ३ ) व्हिओ वाय २०,४ ) रेडमी नोट १० एस, ५ ) सॅमसंग गॅलक्सी ए ५० एस, ६ ) व्हिओ १ ९ ०४ असे एकून ६ मोबाईल किंमत ७७ हजार ४२३ रू चोरले आहेत. याप्रकरणी श्रीकृष्ण शहादेव शिखरे रा. रुई ता. वडवणी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पो. ना. सानप करत आहेत.