आपला जिल्हाराजकारण
बीड मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे लोकसभेचे उमेदवार
बीड : भाजपाचा उमेदवार घोषित होऊन प्रचारही सुरू झाला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार ठरत नसल्याने जिल्ह्याचे लक्ष लागले होते. तर मेटे की, सोनवणे हा तिढा सुटत नव्हता परंतु पवारांनी मार्ग काढत बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभेची उमेदवारी घोषित केली.
कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा टप्याटप्याने होत आहे. बीड लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुटलेली आहे. राष्ट्रवादी सध्या दोन गट पडल्याने पवार नेमकी कोणाला उमेदवारी देणार? याची जिल्ह्यात उत्सुकता होती. पुतण्याला धोबीपछाड देत मागील लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना आपल्या गटात प्रवेश दिला. त्यांच्याच नावाची आज काही वेळापूर्वी उमेदवारीची घोषणा केली.