बीड पोलीस दलात खळबळ! आत्महत्या करतोय म्हणून एसपींना मेसेज करुन कर्मचारी गायब
लोकगर्जना न्यूज
बीड : येथील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यावेळी पोलीस निरीक्षक यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचं सांगत चक्क आत्महत्या करत असल्याचा मेसेज एसपींना पाठवून पोलीस कर्मचारी गायब झाला आहे. सहा तास होऊन गेले तरीही ठावठिकाणा न लागल्याने बीड पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप व पोलीस कर्मचारी शरद पवार यांची एका गुन्ह्याच्या संदर्भात चर्चा करताना शाब्दिक चकमक झाली असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी रवी सानप यांनी पोलीस कर्मचाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिली. आपल्याच अधिकाऱ्याने अपमानास्पद वागणूक दिलेली सहन न झाल्याने शरद पवार यांनी चक्क पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनाच आत्महत्या करत असल्याचा मेसेज केला. हा मेसेज बाहेर समजताच एकच खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचारी शरद पवार यांचा शोध सुरू आहे.