बीड जिल्ह्याला हादरवणारी घटना! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
विकृती; घटनास्थळी उपस्थित महिला काढत होती मोबाईलमध्ये फोटो!
लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यातील दिंद्रुड ( ता. माजलगाव ) ठाणे हद्दीतील एका गावात शेतातील सालगड्याच्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर चार जणांनी अत्याचार केल्याची घटना रविवारी ( दि. १८ ) रात्री उघडकीस आली. धक्कादायक म्हणजे घटनास्थळी एक महिलाही उपस्थित होती अन् ती महिला मुलीला वाचविण्याऐवजी मोबाईलमध्ये नग्न फोटो काढत होती. या प्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्याचे वृत्त आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, मंठा तालुक्यातील एक कुटुंब सालगडी म्हणून दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीतील एका शेतकऱ्याच्या शेतात रहातात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी आई-वडील दोघेही कामासाठी गेले. यावेळी घरात मुलगी एकटीच असल्याची संधी साधून आरोपीने मुलीला ओढत ऊसाच्या शेतात घेऊन गेला. तिथे आदि पासून काहीजण होते. या सर्वांनी एकट्या मुलीच्या इज्जतीचे लच्चके तोडत आळीपाळीने सामुहिक अत्याचार केले. विशेष म्हणजे यावेळी घटनास्थळी एक महिला उपस्थित होती. तीने या श्वानांच्या तावडीतून या असहाय्य मुलीला वाचविण्याऐवजी मोबाईलमध्ये प्रसंगाचे फोटो घेत होती. असा आरोप मुलीने केला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या तक्रारीवरून या महिलेसह पाच जणांवर बाल लैंगिक अत्याचार, ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तीन आरोपींना पोलीसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. ही घटना उघडकीस येताच जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक यांची घटनास्थळी भेट
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अंबाजोगाई अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट दिली.