क्राईम
बीड जिल्ह्यात स्कॉर्पिओने चार जणांना चिरडले दोन सख्ख्या भहिणींचा मृत्यू तर दोन जखमी

बीड : जेवण करून शतपावली करण्यासाठी रस्त्यावर आलेला दोन सख्ख्या भहिणींना स्कॉर्पिओने चिरडले असून यात दोघींचाही मृत्यू झाला. याच स्कॉर्पिओने इतर ही दोघांना धडक दिली यात ते जखमी झाले.घठना रात्री ८ च्या सुमारास पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथे घडली.
रोहिणी महारुद्र गाडेकर आणि मोहिनी महारुद्र गाडेकर असं मृत बहिणींचे नावं आहेत . त्या दोघी जेवण झाल्यावर शतपावली करण्यासाठी जामखेड-पाटोदा रस्त्यावर आल्या होत्या. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओने धडक देऊन चिरडले तर दुसऱ्या दोघांना ही धडक देऊन चालक पसार झाला. या अपघातामध्ये दोन सख्ख्या भहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन जखमींवर पाटोदा ग्रामीण रुग्णालय उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.