क्राईम
बीड जिल्ह्यात पुन्हा भीषण अपघात दोन ठार, चार जण गंभीर
पंढरपूर येथून गावी परतताना भाविकांवर माजलगाव रस्त्यावर काळाची झडप
माजलगाव : पंढरपूर येथून परत आपल्या गावाकडे जाणाऱ्या भाविकांचे पिकअप व ट्रॅक्टरची धडक होऊन घडलेल्या अपघातात दोघे ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. घटना आज बुधवारी दुपारी ३:३० च्या सुमारास तेलगाव-माजलगाव रस्त्यावर नित्रुड जवळ घडली आहे. या रस्त्यावरील अपघातांची वाढती संख्या पहाता जनतेतून चिंता व्यक्त केली जात आहे.
परभणी जिल्ह्यातील सेलू येथील अपघातग्रस्त व्यक्ती असल्याची सुत्रांकडून समजते. ते पंढरपूर येथून आपल्या गावाकडे पालखी मार्गाने जाताना माजलगाव रस्त्यावर नित्रुड जवळ ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व पिकअपची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोघे ठार झाले असून चार जण गंभीर जखमी आहेत. यातील जखमी व मयतांची नावं समजु शकली नाही.