क्राईम
बीड जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस

लोकगर्जनान्यूज
बीड : तालुक्यातील नाळवंडी येथे घरातच एका खोलीत पत्नी मृतावस्थेत तर दुसऱ्या खोलीत पतीचा गळफास घेतलेल्या मृतदेह आढळून आला. ही धक्कादायक घटना आज गुरुवारी ( दि. ४ ) सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
बाबासाहेब रावसाहेब म्हेत्रे, कुषीवर्ता बाबासाहेब म्हेत्रे रा. नाळवंडी ( ता. बीड ) असे मयत पती-पत्नीचे नावे आहेत. हे दोघेही शेतकरी असून, आज गुरुवारी सकाळी दोघांचंही संशयास्पद अवस्थेत मृतदेह घरातच आढळून आली आहेत. ही घटना गावात समजताच घरासमोर मोठी गर्दी झाली. पोलिसांना माहिती कळविताच पिंपळनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. नेमका हा काय प्रकार आहे हे पोलीस तपासात निष्पन्न होईल. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.