क्राईम

बीड जिल्ह्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

लोकगर्जनान्यूज

बीड : तरुण शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेला कंटाळून विषारी द्रव्ये प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना चिंचोली माळी ( ता. बीड ) येथे आज गुरुवारी ( दि. १३ ) दुपारी उघडकीस आली.या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

व्दारकादास भगवान काळे ( वय २५ वर्ष ) रा. चिंचोली माळी ( ता. बीड ) असे आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. रविवारी ( दि. ९ ) रात्री घरातच विषारी द्रव्ये प्राशन केले. हा प्रकार कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने बीड येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रविवार पासून त्याच्यावर बीड येथे उपचार सुरू होते. आज गुरुवारी ( दि. १३ ) अखेर द्वारकादास काळे याची मृत्यूशी असलेली झुंज संपली असून दुपारी १ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे. मागील वर्षी शेतीतून हाती काहीच पडले नाही. यावर्षी पावसाचे असेतसे दिसत असल्याने आर्थिक विवंचनेतून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. मयत द्वारकादास यांच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »