बीड जिल्ह्यात गाळप ३९ लाख टन तर साखर उत्पादन ३२ लाख टन
लोकगर्जनान्यूज
बीड : दुष्काळी परिस्थिती असतानाही जिल्ह्यात यंदा त्या मानाने गाळप समाधान कारक झाली. यावर्षी जिल्ह्यात एकूण सात कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला होता. एकूण गाळप ३९ लाख ४३ हजार ९८२ टन ऊस गाळप केले. ३२ लाख २९ हजार ७५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.
दुष्काळी परिस्थिती असल्याने यावर्षी कारखान्यांना ऊस मिळणार की, नाही? असे चित्र होते. याही परिस्थितीत जिल्ह्यातील पाच सहकारी आणि दोन खाजगी असे सात साखर कारखाने सुरू होते. या कारखान्यांनी ३९ लाख ४३ हजार ९८२ टन ऊस गाळप केले. दुष्काळी परिस्थिती पहाता हा गाळप हंगाम समाधान कारक राहिला असे समजावे लागेल. याला ८.१९ टक्के साखर उतारा येऊन जिल्ह्यात एकूण ३२ लाख २९ हजार ७५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. सध्या पाच कारखान्यांनी आपला गाळप हंगाम आटोपला असल्याचे वृत्त आहे.