बीड जिल्ह्यात खळबळ! झोपेत असलेल्या पत्नी व मुलाची हत्या: आरोपीनेच फोन करून पोलीसांना दिली माहिती
लोकगर्जना न्यूज
माजलगाव : साखर झोपेत असलेल्या पत्नी व मुलाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना माजलगाव तालुक्यातील मंजरथ येथील काळे वस्तीवर घडली आहे. हत्येनंतर स्वतः आरोपीने फोन करून पोलीसांना माहिती दिली. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मंजरथ येथील काळे वस्ती ( ता. माजलगाव ) येथे पांडुरंग दोडतले हे आपल्या कुटुंबासह राहातो. आज मंगळवारी ( दि. ११ ) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास झोपेत असलेली पत्नी व मुलाची ( नावं समजु शकली नाही ) धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर स्वतः आरोपीने माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फोन करून पत्नी व मुलाची हत्या केल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला ताब्यात घेतले आहे. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपास करत आहेत.