बीड जिल्ह्यात खळबळ! अल्पवयीन मुलीची हत्या; आरोपी नातलग
मुख्य आरोपीचे विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न
लोकगर्जनान्यूज
बीड : ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील घोसापूरी येथे नात्यातील आरोपीने अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री ११:३० पुर्वी घडली या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यात पाच आरोपींचा समावेश असून तीन आरोपी पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत. मुख्य आरोपीने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी बन्सी माळी ( वय १७ वर्ष ) रा. घोसापूरी ( ता.बीड ) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. मयत ही आरोपीच्या मामाची मुलगी असून नात्याने भाऊ लागत असलेल्या आरोपीने इतर चारजणांना सोबत घेऊन माझ्या सोबत लग्न का करत नाही? म्हणून होळी या आनंदाच्या सनाच्या पुर्वसंध्येला रात्री उशिरा हत्या केली. या घटनेने खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तपासाची चक्रे फिरवून तीन आरोपींना ताब्यात घेतले. यातील मुख्य आरोपीने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. आरोपींने आत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात असून तो तपासात निष्पन्न होईल.