बीड जिल्ह्यातील 121 ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती; निवडणूकीच्या घोषणेकडे लक्ष
लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 121 ग्रामपंचायतीची मुदत जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात संपली आहे. या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची सूचना प्राप्त झाली होती. त्यावरुन जिल्हा परिषदेचे सीईओ ( CEO ) अजित पवार यांनी ( दि. 15 ) आदेश काढून प्रशासकाची नियुक्ती केली.
मागील डिसेंबर महिन्यातच बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या आहेत. यामुळे आता दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसऱ्या टप्प्यातील बीड जिल्ह्यातील पाटोदा 15, शिरुर का.20, धारुर17,गेवराई 32, अंबाजोगाई 1,बीड 9, केज 23, वडवणी 4 या आठ तालुक्यातील 121 ग्रामपंचायतींच्या 1 ते 31 जानेवारी 2023 दरम्यान मुदत संपते वेळेत निवडणूका घेता येत नसल्याने या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आली. यावरून जिल्हा परिषदेचे सीईओ ( CEO ) अजित पवार यांनी प्रशासकाची नियुक्ती केली. असे आदेश ( दि. १५ ) रोजी काढण्यात आले. यामुळे या ग्रामपंचायतीचा कारभार आता प्रशासकाच्या हाती गेला आहे. प्रशासक नियुक्त होताच आता या दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांचा प्रोग्राम कधी जाहीर होणार याकडे गावकारभारी होण्यासाठी इच्छुक असलेल्यांचे लक्ष लागले आहे. प्रशासक नियुक्त झालेल्या तालुका निहाय ग्रामपंचायतीचे या खालील आहेत.
पाटोदा तालुका :- गांधनवाडी, वाहली सुप्पा, धनगर जवळका, चुंबळी,मुगगाव, उंबरविहीरा, तांबा राजुरी, मांजरी घाट,पिंपळगाव धस, वडझरी, वाघीरा,वैद्यकिन्नी , वयजळा ,जाधववाडी,
शिरुर का. तालुका :- जांब, राक्षस भुवन, तिंतरवणी, पांगरी, शिरापूर,धुमाळ , घो.पारगाव, तागडगाव, आर्वी, पाडळी, बोरगाव च, उकिर्डा च., लिंबा, मलकाची वाडी, तरडगव्हाण आ., हिवरसिंगा, दहीवंडी, वडाळी,गोमळवाडा, पिंपळनेर
धारुर तालुका :- मोहखेड, हिंगणी खु., सोनीमोहा, भोगलवाडी, पिंपरवडा, सुकळी, धुनकवड, चारदरी, हिंगणी बु., शिंगणवाडी, सुरनरवाडी,चिखली,मोरफळी,कुंडी,कान्नापूर,व्हरकटवाडी, गोपाळपूर
गेवराई तालुका :- उमापूर,राहेरी, रोहितळ, भेंड खुर्द, पिंपळगाव, कानडा, हिंगणगाव, सिंदफणा चिंचोली, काठोडा, कट चिंचोली,तांदळा, गोपत पिंपळगाव, तळवट बोरगाव, पिंपरी,रेवकी, रसुलाबाद, शेकटा,अगर नांदूर, वाहेगाव आम्ला, भेंड टाकळी, सेलू, ढालेगाव, गोळेगाव, पाडळसिंगी, औरंगपूर कुकडा, बेलगाव, बोरगाव थडी, संगम जळगाव क, पांढरी, धारवंटा, गैबीनगर तांडा, रामपुरी
अंबाजोगाई तालुका :- डिघोळअंबा
बीड तालुका :- नेकनूर,बाळापुर , पांढऱ्याची वाडी ,धाव ज्याची वाडी, नाळवंडी,लक्ष्मीआई तांडा, ढेकनमोह तांडा, मोरगाव, पोखरी घाट
केज तालुका :- माळेगाव, लिंबाचीवाडी, उंदरी,तरनळी, पिराचीवाडी, शिरपुरा,बोरिसावरगाव, बनसारोळा, नांदुर घाट, होळ, केकाणवाडी, आडस, काळेगाव घाट, सुर्डी, बनकरंजा, डोणगाव, नायगाव, युसुफ वडगाव, पिटी घाट, मुलेगाव, आरणगाव, कोल्हेवाडी, सासुरा
वडवणी तालुका :- खापरवाडी, खडकी,चिंचोटी ,हनुमंत पिंपरी