आपला जिल्हा
बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा एक मोठा नेता कोरोना पॉझिटिव्ह
बीड : माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. अशी माहिती शिवछत्र परिवाराकडून देण्यात आली.
त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत. अमरसिंह पंडित यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी व आपली काळजी घ्यावी असे आवाहनही शिवछत्र परिवाराकडून करण्यात आले आहे.