बीड जिल्ह्यातील नगर पंचायतीचे निकाल घोषित
बीड : जिल्ह्यातील पाच नगर पंचायतीचे निकाल जवळपास घोषित झाले. आष्टी, पाटोदा, शिरुर कासार नरपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व निर्माण झाले तर, केजमध्ये जनविकास आघाडीने सर्वात जास्त जागेवर विजय मिळवला. वडवणीत काट्याच्या लढतीत राष्ट्रवादी कॉंसला बहुमत मिळाले आहे.
जिल्ह्यातील नगर पंचायतीच्या नुकत्याच निवडणूका झाल्या आहेत. आज बुधवारी मतमोजणी होऊन निकाल घोषित झाले. जवळपास पुर्ण चित्र स्पष्ट झाले. आष्टी, पाटोदा, शिरुर कासार नगर पंचायतीच्या सर्वाधिक जागा जिंकून भाजपाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. वडवणीमध्ये राजेभाऊ मुंडे, बाबरी मुंडे पिता, पुत्राला जबरदस्त धक्का बसला. अनेक विकासकामे करुनही येथे भाजपा ८ तर राष्ट्रवादी काँग्रेस ९ असे संख्याबळ असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे येथे भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे. केज नगर पंचायतीमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली येथे कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नाही. परंतु जनविकास आघाडीने सर्वाधिक ८ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी ५, सत्तेत असलेल्या कॉंग्रेसची मोठी वाताहत झाली असून त्यांना केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले. स्वाभिमानी पक्षाचा १ सदस्य विजयी झाला असून या एका सदस्याला महत्व प्राप्त झाले आहे.