बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना! प्रेमीयुगुलाची गळफास ‘ती’ वाचली… त्याचा मृत्यू
बीड : फेसबुकवरील मैत्रीचं प्रेमात रुपांतर झाले. विवाहित महिलेने प्रेमीला भेटण्यासाठी गेवराई तालुक्यातील भेंड बुद्रुक गाव गाठलं… प्रेमीयुगुलांची भेटही झाली. परंतु महिलेच्या पतीने पोलीसात तक्रार करतोय म्हणून सांगताच भीती पोटी साथ जीयेंगे… साथ मरेंगे.. म्हणत एका दोरीने गळफास घेतला. परंतु दोरी तुटल्याने प्रेमीका वाचली तर तरुणाचा मृत्यू झाला. घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
जयपाल लक्ष्मण वाव्हळ ( वय २७ ) रा. भेंड बु. ता. गेवराई असे मयत तरूणाचे नाव आहे. जयपाल आणि कल्याणची एक तीस वर्षीय विवाहित महिला फेसबुक मित्र होते. चॅटिंग, दररोज बोलणं यातून त्यांचे प्रेमसंबंध जुळले. ती प्रेमात इतकी आंधळी झाली की, आपलं लग्न झालेले हे विसरून दोन दिवसांपूर्वीच कल्याण हून थेट भेंड येथे आली . येथे येताच या विवाहितेच्या पतीने (दि . १६ ) रविवारी फोन करून गुन्हा दाखल करील असे बजावले. गुन्हा दाखल होईल या भीतीपोटी साथ नही जियेतो साथ मरेंगे म्हणत पहाटे घरातील आडुला प्रेमी युगलाने गळफास घेतला.महिलेची दोरी तुटल्याने ती वाचली मात्र जयपाल वाव्हळ यास फास लागून मृत्यू झाला . घटना सोमवारी ( दि. १७ ) सकाळी उघडकीस आली. परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी तलवाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.