बीड जिल्ह्यातील दोन क्रिकेटर महाराष्ट्राच्या संघात
गोवा येथे होणाऱ्या गोवा गोल्ड कप स्पर्धेत खेळणार
लोकगर्जनान्यूज
बीड : गोवा कप स्पर्धा येत्या 25 तारखेपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या राज्याच्या संघात बीड जिल्ह्यातील दोन क्रिकेटरांची वर्णी लागली आहे. हे दोन्ही खेळाडू माजलगाव येथील असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
गोवा गोल्ड कप – 2023 क्रिकेट स्पर्धा गोवा येथे येत्या 25 ते 28 एप्रिल असे तीन दिवस चालणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सहभाग घेतला असून यांनी यासाठी राज्यातून खेळाडू निवडले आहेत. यामध्ये माजलगावचे प्रथमेश गणेश शेटे, सौरभ सुनिल गायकवाड टि-20 क्रिकेट महाराष्ट्र असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) संघात निवड झाली. हे दोन्ही खेळाडू ऑल राऊंडर क्रिकेटर म्हणून ओळखले जातात. त्यांनी चिकाटी व मेहनतीच्या जोरावर क्रिकेट मध्ये वेगळी ओळख निर्माण केली. दोघेही माजलगाव येथे क्रिकेट अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेतात. यांना शेख फेरोज, गोविंद टाकणखार, विनोद कोमटवार, मिरवाज खाँ, पेंटर भगवान, घायतिडक, शेख हाय्युम, यांचे मार्गदर्शन मिळत आहे. या दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करण्यात येत आहे.