क्राईम
बीड जिल्ह्यातील एक माजी आमदार अपघातात बालंबाल बचावले
केज : बीड रस्त्याने जाताना माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या वाहनाचा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर स्वरुपाचा मार लागला नाही. अपघात घडताच रस्त्याने युवकने अक्षय मुंदडा चालले होते, त्यांनी वाहन थांबवून जखमींना मदत करुन दवाखान्यात पाठवले.
आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास माजी आमदार पृथ्वीराज साठे केज-बीड रस्त्याने जाताना त्यांच्या गाडीसमोर अचानक एक दुचाकीस्वार आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात गाडी पलटी होऊन रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. गाडीचे मोठं नुकसान झालं परंतु यामध्ये कोणालाही गंभीर इजा झाली नाही याचे समाधान व्यक्त केले जात आहे. ही घटना टाकळी पाटी जवळ घडली आहे.