बीड जिल्हा रुग्णालयात गर्भाशयावरील मोठी शस्त्रक्रिया यशस्वी; काढला तीन किलोचा गोळा
बीड : येथील जिल्हा रुग्णालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉक्टर सुरेश साबळे यांनी शस्त्रक्रिया विभागामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करून आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा देण्याचा काम करत आहेत दिनांक 14/03/2022 रोजी गर्भाशयावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी गेवराई तालुक्यातील एक 45 वर्षीय महिला दाखल झाली होती अवघ्या बारा तासातच जिल्हा रुग्णालयाच्या टीमने शस्त्रक्रिया करून गर्भशायवरील तीन किलोचा गोळा काढला आहे
शकीला युसुफ शेख वय 45 राहणार गेवराई ही महिला गेल्या दोन वर्षापासून आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याने खाजगी रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया करण्याची परिस्थिती नसल्याने त्रास सहन करत होती यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांना माहिती कळताच त्यांनी या रुग्णांच्या शस्त्रक्रिया साठी लागणारे सर्व तपासण्या तात्काळ करून घेण्याचे आदेश दिले व आज दिनांक15,3,2022 सकाळी दहाच्या सुमारास स्वतः हजर राहून गर्भाशयावरील मोठी शस्त्रक्रिया करून तब्बल तीन किलोचा गोळा काढला आहे
ही शस्त्रक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे स्त्री रोग तज्ञ डॉक्टर शहाणे डॉक्टर आव्हाड भूल तज्ञ डॉक्टर मोराळे स्त्री रोगतज्ञ डॉक्टर शिंदे आदींनी केली आहे.