बीड जिल्हा राष्ट्रवादी आढावा बैठकीत रिक्त पदाधिकार्यांची निवड
लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गुरूवार (दि.२८) रोजी राष्ट्रवादी भवन येथे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांची जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी पक्षाच्या रिक्त असलेल्या पदांसाठी पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या.
बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर यांनी गुरुवारी (दि.२८) रोजी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात विविध स्तरावर सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. तसेच रिक्त असलेल्या
पदांसाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या बैठकीत, आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच पुढील वाटचालीसाठी चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्हा सरचिटणीस पदी डॉ. उत्तम दत्तोबा खोडसे, माजलगाव तालुकाध्यक्ष पदी मनोहर डाके व मागासवर्गीय सेलच्या बीड शहराध्यक्ष पदी कपील इनकर यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना आ. क्षीरसागर यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या बैठकीस सर्व प्रमुख पदाधिकारी व जिल्हाभरातून कार्यकर्ते उपस्थित होते.