क्राईम

बीड जवळ दुचाकींचा भीषण अपघात;दोन जण ठार

 

लोकगर्जना न्यूज

बीड : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघात दोन जण जागीच ठार झाले. यावरून या अपघाताची भीषणता लक्षात येते. सदरील घटना आज मंगळवारी ( दि. ३१ ) बीड-परळी रस्त्यावरील जरुड फाट्यावर घडली आहे.

सुभाष लक्ष्मण राठोड रा. वडवणी खोरी तांडा, नरेंद्र प्रभाकर जोशी रा. रामगड नगर बीड अशी मयताची नावे आहेत. नरेंद्र जोशी हे वडवणी येथे महावितरण मध्ये ऑपरेटर आहेत. सकाळी ते दुचाकीवरून वडवणी कडे जात होते तर, सुभाष राठोड हे वडवणी येथून बीडकडे येत होते. दरम्यान जरुड फाट्यावर दोघांच्या दुचाकींची‌ समोरासमोर जोरात धडक झाली. धडक होताच दोघेही रस्त्यावर फेकले गेले व दोघांनाही जबर मार लागल्याने दोघेही जागीच ठार झाले. एम.एच. २३ ए एम ८५३७ व‌ एम. एच. ४४ वाय ३५२७ असे अपघातग्रस्त दुचाकीचे नंबर आहेत.‌ अपघात घडताच घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याने अर्धातास बीड-परळी मार्ग बंद होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »