आपला जिल्हा
बीडमध्ये स्वाईन फ्लुचे दोन रुग्ण आढळले

लोकगर्जना न्यूज
बीड : जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. आठ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
पाटोदा तालुक्यातील अमळनेर एक ३२ वर्षीय महिलेला स्वाइन फ्ल्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच एक महिला मुंबई येथून आलेली आहे. पाटोदा तालुक्यातील महिलेने कुठेही प्रवास केलेला नाही. स्वाइन फ्ल्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुंबई येथे नौकरी निमित्त रहाणाऱ्या महिलेची तपासणी मुंबई येथे झालेली आहे. त्या बीड येथे आल्यानंतर त्यांना स्वाइन फ्ल्यू झाल्याची माहिती देण्यात आली. उपचारासाठी बीड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. यासह ८ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.