आपला जिल्हाकृषी

बीडच्या शेतकऱ्यांना सफरचंदाची भुरळ; तेलगाव नंतर टाकरवण येथे फुलली बाग

 

लोकगर्जना न्यूज

माजलगाव : बीड जिल्ह्यात सफरचंदाची शेती करायची म्हटले तर त्यास वेढ्यात काढलं जाईल परंतु शेतकऱ्यांनी ठरवलं तर काहीच अशक्य नाही. जिल्ह्यातील तेलगाव व टाकरवण येथील शेतकऱ्यांनी सफरचंद शेतीचा प्रयोग यशस्वी केला. टाकरवण ( ता. माजलगाव ) येथील प्रगतिशील शेतकरी डॉ. प्रशांत तौर यांनी एक एकरात सफरचंद लागवड केली. त्यास फळेही लगडली आहेत. दोन ठिकाणी हा प्रयोग यशस्वी झाल्याने शेतकरी याकडे वळला तर नवल वाटायला नको?

सफरचंदाची शेती म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर येते काश्मीर, हिमाचल प्रदेश हे थंड हवेचे ठिकाण. परंतु सफरचंद मध्येही अता असे वान आहेत. ते कोरडे व उष्ण ठिकाणीही त्याचं उत्पादन घेता येते. याचा प्रयोग बीड जिल्ह्यातील तेलगाव येथे आणि टाकरवण येथे यशस्वी झाला. यामुळे दुष्काळी जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बीडच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. टाकरवन ( ता. माजलगाव ) येथील डॉ.प्रशांत तौर हे सांगतात की, बऱ्याच दिवसांपासून मी पारंपारीक शेतीला फाटा देत काहीतरी वेगळा प्रयोग करण्याच्या विचारात होतो. परंतु काही मार्ग सापडत नव्हता. लॉकडाऊनच्या काळात सर्व काही थांबलेलं असताना मनातील विचार मात्र सुसाट धावत होते. यावेळी मला सफरचंद बाबतीत माहिती मिळाली. काही वान आपल्या बीड जिल्ह्यातील वातावरणात येऊ शकतात हे समजलं. मी जसा विचार करत होतो तसाच प्रयोग असल्याने कोरोनाकाळातील मोकळ्या वेळेचा सदुपयोग केला. जानेवारी महीन्यात लागवड पुर्व मशागत करुन एचाआरएमएन ९९, गोल्डन, ट्रॉपिकल स्वीट, या जातीच्या ३०० रोपांची एक एक्कर श्रेञावर दहा बाय दहा अतंरावर लागवड केली.हे रोपे हिमाचल प्रदेश मधून मागविली.एका वर्षातच या झाडांना फळे लगडली आहेत.थंड हव्याच्या ठिकानचे पीक असले तरी संशोधन केल्याने आता मराठवाड्यात कमी जास्त उष्णतेत देखील सफरंदाच घेता येनार आसल्याचे लक्षात घेता तौर यांचा प्रयोग यशस्वी झाला. पारपांरीक पिकाबरोबरच शेतीतून आर्थीक उन्नती साधन्यासाठी जिद्द मेहनत योग्य नियोजनाच्या बळावर सफरचंद ही शेतकऱ्यांसाठी चांगले उत्पन्न देणारे पीक ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पारंपरिक पद्धतीने शेतीला पर्याय उपलब्ध करून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल या उद्देशाने प्रायोगिक तत्वावर प्रयत्न चालू आहेत. सफरचंद सारखी आनेक पिके आहेत जी आपल्या भागा मध्ये घेतली जात नाहीत त्याची सुद्धा लागवड करणार असल्याची माहीती टाकरवनचे प्रयोगशिल शेतकरी प्रा.डॉ.प्रशांत तौर यांनी दिली

लागवडीची पद्धत, वान व वेळ

सफरचंदाची शेती करण्याची इच्छा असणाऱ्या शेतकऱ्यांनी डिसेंबर, जानेवारी महिन्यात लागवड करावी. हिमाचल प्रदेश मधे हे रोपे मिळतात. रोपांच्ची किंमत ही वेगवेगळी आहे. जसे एच एचाआरएमएन ९९ किंमत १२५, ट्रॉपिकल स्वीट २००, गोल्डन १७५ या प्रमाणे प्रत्येक वानाची वेगळी किंमत आहे. २० ते २५ वान असून ते मराठवाडा विभागात लागवड करण्या सारख्या आहेत. सफरचंद रोपांची लागवड १० बाय १०, १० बाय १२, १० बाय १५ या प्रमाणे करावी लागते.

वातावरण कसे असावे

यासाठी थंडी ४०० ते ५०० तास आवश्यक आहे. जमीन हलकी उत्तम पाणी निचरा होणारी, उतार असणारी चांगली आहे. पावसाळ्यात पाणी साचनारी जमीन नसावी,. यावर मूळसड हा बुरशीजन्य रोग जास्त निर्माण होतो. यासाठी ट्रायकोडरमा किंवा रासायनिक बुरशीनाशक साफ याचा वापर आवश्यक आहे. मुळाला वाळवी कीड लागू नये यासाठी क्लोरोपायरिफोस याचा वापर करावा लागतो. याचे फळे जुन आणि जुलै महिन्यात विक्री साठी उपलब्ध होतात. यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य याचीसुद्धा फावरणी आवश्यक असते. सफरचंद या फळाला उत्तम प्रकारचा रंग या वर्षी आला आहे.

एकरी उत्पन्न १० लाख अपेक्षित

या पिकापासून सहा वर्षा नंतर एकरी ८ ते १० लाख उत्पादन शक्य आहे. यावर्षी सफरचंदाचा दर १५० ते २५० रुपये प्रती किलो होता. एका झाडापासून सहा वर्षा नंतर ७० ते ८० किलो उत्पादन निघते. त्यामुळे १० लाख उत्पन्न सहज रित्या निघू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »