बीडच्या बिंदुसरा धरणात तरुणाचा मृतदेह आढळला
लोकगर्जनान्यूज
बीड : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाली जवळील बिंदुसरा धरणात आज गुरुवारी ( दि. ५ ) दुपारी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला असून, त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाल्याचे वृत्त आहे. परंतु आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.
समजलेली अधिक माहिती अशी की, संतोष बाळु भुजंगे ( वय ३८ वर्ष ) रा. नेकनूर ( ता. बीड ) असे मयताचे नाव आहे. आज दुपारी संतोष भुजंगे यांचा मृतदेह बिंदुसरा धरणात पाण्यावर तरंगताना दिसून आला. याची बीड ग्रामीण पोलीसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस आनंद मस्के, पी.टी. चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देवून मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. संतोष बाळू भुजंगे याने रागाच्या भरात आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. परंतु पोलीसांच्या तपासात कारण निष्पन्न होईल.