बीडच्या परिक्षा केंद्रावर डमी परिक्षार्थी पकडला; म्हाडा परिक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न चिन्ह!
बीड : येथे आज म्हाडाच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने परिक्षा घेण्यात आली. यावेळी केंद्रावर एक डमी परिक्षार्थी असल्याचा संशय आल्याने याची पोलीसांना माहिती दिली. पोलीसांनी येऊन चौकशी करताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु महिला पोलीस संगिता सिरसाट यांनी पाठलाग करुन त्यास मोठ्या धाडसाने पकडले. त्याकडून डिव्हाईस, मायक्रोफोन सह आदि साहित्य मिळून आले. डमी परिक्षार्थी पकडल्याने पुन्हा या परिक्षेवर प्रश्न उपस्थित झाला आहे.
यापुर्वीच म्हाडाच्या यापुर्वीच परिक्षा घेण्यात येणार होत्या परंतु पेपर फुटत असल्याचे जाणवल्यामुळे परिक्षा पुढे ढकलण्यात आली. आज ती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. बीड येथेही बसस्थानकाच्या मागे दिशा कॉम्प्युटर येथे परिक्षा केंद्र देण्यात आले. परिक्षार्थी हॉलमध्ये जात असताना एकावर परिक्षा केंद्रावरील काहींना संशय आला. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस परिक्षा केंद्रावर धडकले. संशयित डमी परिक्षार्थीची चौकशी करताच त्याने धुम ठोकली. पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याने महिला पोलीस संगिता सिरसाट यांनी पाठलाग सुरू केला. जालना रोडवर त्यास सहकारी संजय राठोड, मोहसीन शेख व इतर एक यांच्या मदतीने मोठ्या शिताफीने पकडले. अर्जुन बिलाल बिघोट ( वय २५ वर्ष ) रा . कन्नड जि . औरंगाबाद असे असून, पोलीसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ओळखपत्र आढळून आले नाही . मायक्रो फोन सह इतर साहित्य मिळून आले . तो राहुल किसन सानप रा . वडझरी ता . पाटोदा, या विद्यार्थ्याच्या जागी परीक्षा देण्यासाठी आल्याचे चौकशीतून पुढे आले. यापुर्वीच आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरण राज्यभर गाजले असून पुन्हा म्हाडा परिक्षेतही वडझरी कनेक्शन आढळून आले. त्यामुळे या परिक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. डमी परिक्षार्थी अर्जून यास शिवाजी नगर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. येथे चौकशीमध्ये बऱ्याच गोष्टी उजेडात येऊ शकतात?