आपला जिल्हा

बीडच्या डाक ( Post Office Beed ) मध्ये रोजगाराची संधी; ‘या’ तारखेला मुलाखती

लोकगर्जनान्यूज

बीड : येथील डाक ( Post Office ) येथे १८ ते ५० वर्षांच्या वयातील व्यक्तींसाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा सल्लागारची पदे भरण्यात येणार आहेत. डायरेक्ट एजंट ( Direct Agent ) नियुक्तीसाठी पुढील महिन्यात दि. ७ फेब्रुवारी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज डाक अधिक्षक कार्यालय,बीड ( Post Office ) येथे उपलब्ध आहेत.

डाक ( Post ) म्हणजे पत्र पाठविण्यापुरते मर्यादित राहिले नसून, बँकिंग, एटीएम ( ATM ), विमा या सेवा सुरू केल्या आहेत. ही केंद्र शासनाचे असल्याने यावर जनतेचा विश्वास आहे. या डाक कार्यालय बीड ( Post Office Beed ) कडून रोजगाराच्या शोधात असलेल्यांसाठी विमा सल्लागार पदाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. डायरेक्ट एजंट ( Direct Agent ) भरती करण्यात येणार आहे. यासाठी वय वर्ष १८ पुर्ण ते ५० वर्षांपर्यंत अट आहे. शिक्षणासाठी इयत्ता १० वी पास अथवा समकक्ष पास असावं, यासाठी कोणत्याही विमा कंपनीचा माजी सल्लागार, सेवानिवृत्त शिक्षक, महिला, अंगणवाडी ताई, ग्रामपंचायत सदस्य सह ज्यांना लोकांच्या संपर्कात रहाणं आवडते व चांगलं संवाद कौशल्य आहे असे सर्व यासाठी अर्ज करु शकतात. व्यवसायिक कौशल्य, संगणक ( computer ) ज्ञान, व्यक्तीमत्व, स्थानिक भागाची माहिती याचा विचार करून मुलाखती व्दारे थेट नियुक्ती करुन तात्पुरता परवाना देण्यात येणार आहे. तसेच यानंतर तीन वर्षांत यासंबंधीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कायम स्वरुपी परवाना मिळेल. यासाठी ५ हजार रुपये अनामत म्हणून रक्कम ठेवावी लागते. ही नियुक्ती कमिशन तत्वावर असून इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज भरुन बीड डाक अधिक्षक कार्यालयात जमा करावे तसेच अधिक माहितीसाठी बी.एस. मोरे बीड विभाग डाक कार्यालय, मो. क्र. 8208557959 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »