बीडच्या गंभीर रुग्णांना औरंगाबाद, अंबाजोगाईला रेफरची गरज भासणार नाही!
शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळेंच्या प्रयत्नांना यश

बीड : येथील जिल्हा रुग्णालयात केवळ १० बेडचं अतिदक्षता विभाग ( आयसीयू वार्ड ) असल्याने पुर्ण क्षमतेने भरला की, गंभीर रुग्णांना औरंगाबाद अथवा अंबाजोगाई येथे रेफर करावं लागतं असे. परंतु जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळेंच्या प्रयत्नांना यश आले असून, जिल्हा रुग्णालयात आजपासून अतिरिक्त १२ बेडचं अतिदक्षता विभाग सुरू झाला. यामुळे आता गंभीर रुग्णांना इतरत्र रेफर करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे जनतेतून डॉ. साबळेंचे आभार मानले जात आहे.
बीड तालुक्यासह आष्टी, पाटोदा, वडवणी,शिरुर कासार, गेवराई, माजलगाव तालुक्यातील सर्वसामान्य गंभीर आजारी रुग्णांना बीड येथील जिल्हा रुग्णालयाचा आधार आहे. परंतु येथे केवळ १० बेडचं आयसीयू वार्ड आहे. बेडची संख्या अपुरी असल्याने तो नेहमी पुर्ण क्षमतेने भरलेला असतो. यानंतर आलेल्या गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याने औरंगाबाद येथील घाटी अथवा अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात रेफर करावं लागतं असे. कारणं खाजगी दवाखान्यातील आयसीयू वार्डचं खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नाही. हेच अडचण ओळखून कर्तव्यदक्ष जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी आयसीयू बेड वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एक महिना याचा पाठपुरावा करून अखेर आज सोमवारी ( दि. ३० ) जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त १२ बेडच्या क्षमतेचे नवीन आयसीयू वार्ड सुरू केले. आता एकूण २२ बेडचे आयसीयू वार्ड झाले. यापुढे आता गोरगरीब गंभीर रुग्णांना इतरत्र रेफर करण्याची गरज भासणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तसेच डॉ. साबळे यांनी पदभार घेतल्यापासून जिल्हा रुग्णालयात अनेक बदल घडवून आणले आहेत. तसेच विविध शस्त्रक्रिया सुरू केल्या. केमोथेरपी, प्रसुती विभाग सुधारणा अशा अनेक सुधारणा केल्या आहेत. त्यांच्या कार्यपध्दीमुळे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.