क्रीडा
बीडची मान उंचावली:अविनाश साबळेंना अर्जून पुरस्कार घोषित
लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्याचा भूमिपुत्र धावपटू अविनाश साबळे यांना अर्जून पुरस्कार घोषित झाला. ही बातमी समजताच साबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यामुळे बीड जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय धावपटू बीडचा भूमिपुत्र अविनाश मुकुंद साबळे यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत स्टीपलचेस मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सिल्व्हर पदक जिंकून जगात भारत देशाची मान उंचावली आहे. क्रीडा मंत्रालयाने मानाचा अर्जून पुरस्कार घोषित केला. यामुळे बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून देशात बीडची मान उंचावली आहे. ही बातमी समजताच अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. जिल्ह्याच्या खासदार यांनीही ट्विट करुन अविनाश साबळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.