आपला जिल्हा

बिबट्याची leopard and cheetah शेतकऱ्यांमध्ये भीती पण घडलं वेगळच?

 

लोकगर्जनान्यूज

वडवणी : तालुक्यातील चिखलबीड शिवारात बिबट्याचा ( leopard and cheetah ) वावर होता. तो अनेक शेतकऱ्यांच्या नजरेस पटल्याने त्याची भीती निर्माण झाली. अनेकांनी रात्री शेतातील जागल बंद केली. पण आज शनिवारी ( दि.22 ) सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळला अन् बघ्याची गर्दी जमली. शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. घटनास्थळी वन विभागाचे पथक दाखल झाले.

बीड जिल्ह्यात गेवराई, शिरुर का. सह आदि ठिकाणी जिथे ऊसाचे क्षेत्र जास्त आहे तेथे बिबट्याचा ( leopard and cheetah ) वावर अधिक प्रमाणात असल्याचे मागील काही घटनांमुळे दिसून येत आहे. यापूर्वी गेवराई तालुक्यात एक बिबट्या मृतावस्थेत आढळला आहे तर एकाला कारची धडक बसलेली आहे. दोन वर्षांपूर्वी शिरुर का. व आष्टी तालुक्यात एका नरभक्षक बिबट्याने ( leopard and cheetah ) धुमाकूळ घातल्याने एकप्रकारे दहशत निर्माण झालेली आहे. वडवणी तालुक्यातील चिखलबीड शिवारात कुंडलीका धरणामुळे ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. येथे लपण्यासाठी बिबट्याच्या आवडीचे क्षेत्र निर्माण झाल्याचे येथे काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता. तो अनेकांच्या नजरेसही पडला होता. दररोज कुठेना कुठे शेतकऱ्यांना दिसत असल्याने रात्री गावात त्याचीच चर्चा असायची. या बिबट्याच्या ( leopard and cheetah ) भीतीमुळे अनेकांनी शेतातील जागल मोडीत काढली होती. दिवसाही काम करताना मनात कायम भीती होती. आज शनिवारी ( दि. 22 ) सकाळी वडवणी रस्त्यावर असलेल्या चिखलबीड शिवारातील बाबुराव तांदळे यांचा शेतात सालगडी ऊसाच्या शेतात काम करीत होता. यावेळी त्यांना दुर्गंधी येऊ लागल्याने काहीतरी मरण पावले असल्याचा अंदाज आला. ते शोधण्यासाठी गेले असता ऊसाच्या फडात बिबट्या मृतावस्थेत आढळला. याची माहिती त्यांनी शेत मालक बाबुराव तांदळे यांना दिली. ते काहीजण शेतात आले. तोपर्यंत गावातही ही बातमी पसरली अन् ज्या बिबट्याची ( leopard and cheetah ) भीती मनात होती त्याला पहाण्यासाठी सर्व गावच उलटलं यामुळे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेची माहिती वन विभागाला देताच तेही कर्माचारी घटनास्थळी पोचले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »