राजकारण

बालाघाटातील आदिवासी जाती जमातीचे प्रमाणपत्र सुलभ रीतीने मिळवून देणार –आमदार रमेश पाटील

अंबाजोगाई येथे कोळी महासंघाचा जनसंवाद कार्यक्रम संपन्न

लोकगर्जनान्यूज

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील बालाघाटातील आदिवासी महादेव कोळी जाती जमातीचे प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्र हे येत्या काळात सुलभ रीतीने मिळवून देणारा असे आश्वासन विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांनी अंबाजोगाई येथील आयोजित जनसंवाद या कार्यक्रमात बोलताना दिले.

अंबाजोगाई येथे बीड व परभणी जिल्ह्यातील कोळी महासंघातील कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यासाठी कार्यकर्ता जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन ( दि. 2 ) शुक्रवारी आयोजन करण्यात आले .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून, कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर, राज्य उपाध्यक्ष शिवशंकर फुले राज्य सहसचिव सतीश धडे यांची प्रमुख उपस्थिती होती

या जनसंवाद कार्यक्रमात बीड आणि परभणी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या पदाधिकारी निवडी करण्यात आल्या बीड जिल्हाध्यक्षपदी महादेव कंडूकटले तर बीड लोकसभा अध्यक्षपदी गोरख पूर्णे यांची निवड करण्यात आली अंबाजोगाई तालुकाध्यक्षपदी अरुण दहिभाते उपाध्यक्षपदी राजेभाऊ यशवंत यांची निवड करण्यात आली.

या जनसंवाद कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी आदिवासी कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र सुलभ रीतीने मिळत नाही दहावी बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र वेळेत मिळत नाही विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे आम्हाला सुलभ रीतीने प्रमाणपत्र मिळावे अशी एक मुखी मागणी आदिवासी कोळी समाज बांधवांनी आमदार रमेश पाटील यांच्याकडे केली.

पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की आदिवासी महादेव कोळी जमातीवर या आदी खूप अन्याय झालेला आहे. अन्याय दूर करण्याचे काम कोळी महासंघाच्या माध्यमातून करणार आहे.

माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आदिवासी जमातीचे समस्या सोडवण्यासाठी येत्या महिनाभरात मीटिंग लावून आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे .दहावी बारावी निकाल लागले आहेत. विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्र आवश्यक आहे इतर जातीप्रमाणे आदिवासी जमातीचे प्रमाणपत्र सुलभ रीतीने कुठलीही अडचण न येता मिळून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आदिवासी कोळी समाजाला महाराष्ट्रभर फिरून जागृत करत आहे. आदिवासी जमातीच्या प्रत्येक कुटुंबात लघुउद्योग गेला पाहिजे याचा मी प्रयत्न करत आहे .समाजातील बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचे काम मी करत आहे .समाज आर्थिक प्रबल झाला पाहिजे. गेल्या महिन्यातच लोणावळा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. आदिवासी कोळी समाजाने उद्योगधंदे करून पुढे यावे असे आवाहन आमदार रमेश पाटील यांनी केले. आदिवासी जमातीवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही सरकारकडून आदिवासी समाजा ला जास्तीत जास्त मदत करण्याचे काम येथून पुढल्या काळात करण्यात येईल असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश धडे यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार दिलीप बिलपे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »