बारावी, ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी:अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
ईपईएफओ व्दारे 2859 पदे भरणार
लोकगर्जनान्यूज
बारावी, ग्रॅज्युएशन झालं आता सरकारी नोकरीची प्रतिक्षा करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 29 हजार 200 ते 92 हजार 300 रुपये पगाराची नोकरी आहे. यासाठी इयत्ता 12 व ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांची भरती करण्यात येणार आहे. एकूण 2859 इतकी पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी वय मर्यादेची अट व अर्ज भरण्याची शेवटची तारीख किती यासाठी ही पुर्ण बातमी वाचावी लागेल.
EPFO ( ईपईएफओ ) एकूण 2859 पदे भरण्यात येणार आहेत. यामुळे सोशल सिक्युरिटी असिस्टंट ( Social Security Assistant ) पदे एकूण 2674 इतकी तर स्टेनोग्राफर ( Stenographer ) पदे 185 असे दोन्ही पदे मिळून 2859 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी काल सोमवार ( दि. 27 ) पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. शेवटची तारीख 26 एप्रिल 2023 आहे. यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी तरुणांसाठी चांगली संधी असून, याचे अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
शिक्षणाची अट
या दोन्ही पदासाठी 12 व ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. सोशल सिक्युरिटी असिस्टंट पदासाठी पदवीधर ( graduate ) असण्याबरोबरच इंग्रजी 35 शब्द व हिंदी 30 शब्द प्रति मिनिट टाईपिंग स्पीड आवश्यक आहे. तसेच स्टेनोग्राफर पदासाठी तुम्ही 12 पास तसेच प्रति मिनिट 80 शब्द ( Destination) डिक्शनेशन टाईपिंग पात्रता आवश्यक आहे.
वय मर्यादा
या पद भरती मध्ये दोन्ही पदांसाठी वयाची मर्यादा ही 18 ते 27 असून ही खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी आहे. आरक्षित जागेवरील उमेदवारांना नियमाप्रमाणे वय मर्यादेत सूट मिळेल.
पगार व निवड
सोशल सिक्युरिटी असिस्टंट पदासाठी 29 हजार 200 ते 92 हजार 300 तर स्टेनोग्राफर पदासाठी 25 हजार 500 ते 81 हजार 100 असा पगार असल्याचे वृत्त आहे. यासाठी संगणक ( computer ) लेखी आणि टायपिंग चाचणी घेतली जाईल तसेच स्टेनोग्राफर पदासाठी या दोन्ही सोबत स्टेनो कौशल्य स्किल ( skill ) पाहिले जाईल