आपला जिल्हा

बाबुरावजी आडसकरांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणसं जोडली-खासदार प्रितम मुंडे

माजी आमदार बाबुरावजी आडसकर यांचे सातवे पुण्यस्मरण

लोकगर्जनान्यूज

केज : प्रत्येकाला छत्रपती शिवरायांसारखे सामर्थ्यवान बनविण्याचे सामर्थ्य संत तुकाराम महाराजांकडे होते. त्याप्रमाणेच आपल्या आयुष्यात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कामाच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय देऊन सक्षम बनविण्यासाठी माजी आमदार बाबुरावजी आडसकर यांनी त्यांच्या हयातीत काम केल्याने ते लोकनेते झाल्याचे महादेव महाराज बोराडे यांनी शुक्रवार (ता.२५) रोजी आडस येथे माजी आमदार बाबुराव आडसकर यांच्या सातव्या पुण्यस्मरणार्थ आयोजित किर्तन सेवेत बोलताना सांगितले.
जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या रांगड्या भाषेतून जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे दिवंगत माजी आमदार बाबुराव आडसकर यांच्या सातव्या पुण्यस्मरणार्थ आडस येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात शुक्रवारी महादेव महाराज बोराडे यांच्या किर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉ. प्रितम मुंडे, माजी आमदार मोहनराव सोळंके, माजी आमदार राधाकृष्ण पाटील, पृथ्वीराज साठे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पखवाज वादक उद्धव बापू आपेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, गोविंद देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, केज बाजार समितीचे सभापती अंकुशराव इंगळे, माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील, नगराध्यक्षा सिता बनसोड, हारून इनामदार, गंगामाऊली शुगरचे हनुमंत मोरे, उपसभापती डॉ. वसुदेव नेहरकर, धारूरचे माजी नगराध्यक्ष शेषेराव फावडे, भाजपाचे शहराध्यक्ष ॲड. मोहन भोसले, काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष राहुल सोनवणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष नगरसेवक बबन लोमटे, भगवान केदार, आंबासाखरचे व्हायचेअरमन दत्तात्रय पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेभाऊ औताडे, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजाभाऊ मुंडे, दत्ता शिंदे, अंबाजोगाई बाजार समितीचे माजी सभापती विलास सोनवणे, धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील शिनगारे, माजी सभापती संभाजी इंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्यं सुरेश पाटील, रमाकांत मुंडे, किसन कदम, माजी उपसभापती लक्ष्मीकांत लाड, आंबासाखरचे संचालक ॲड. बालासाहेब इंगळे, बाजार समितीचे संचालक अरूण धपाटे, माजी संचालक अशोक मोराळे, शिवाजी मायकर व विष्णू घुले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रमेश आडसकर यांनी आमच्या वडिलांनी जपलेला सामान्य जनतेच्या कल्याणाचा वसा पुढेही चालूच ठेवणार असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना खासदार मुंडे म्हणाल्या, आडसकर-मुंडे यांच्यात अनेक निवडणुकीत लढत झाली. मात्र त्या दोघातील आपुलकीचे नाते कायम होते. त्यामुळे त्यांनी घालून दिलेले संस्कार सध्याच्या राजकीय परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. उपस्थितांचे माजी उपसभापती ऋषिकेश आडसकर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सुरेश शिनगारे यांनी सुत्रसंचलन करून आभार मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी व आडसकर कुटुंबियांचे चाहते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »