आपला जिल्हा

बाप….रे… मागील वर्षात इतक्या शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले?

 

लोकगर्जना न्यूज

जगाजा पोशिंदा, शेतकरी राजा म्हटलं जाणाऱ्या शेतकऱ्यांचं जगणं अवघड झाल्याचे दिसत आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, कधीं पीकच आलें नाही तर कधी भावच नाही असे दरवर्षी काहीना काही संकट यामुळे वाढत चाललेलं डोक्यावरील कर्ज याला कंटाळून शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत असून मागील वर्षाच्या ३६५ दिवसात बीड जिल्ह्यातील २१० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असल्याचे समोर आले. हा आकडा पहाता चिंता व्यक्त केली जात आहे.

निसर्गाचं लहरीपणा वाढल्याने कधी पाऊस पडला नाही म्हणून कोरडा दुष्काळ तर कधी अति पाऊस झाल्याने ओला दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातील पिके नष्ट होत आहेत. कधी पाऊस चांगला पडला पीकही चांगले आले तर बाजारभाव पडतात. त्यामुळे रात्रीचा दिवस करून पिकलेले शेती पीक कवडीमोल दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. मागील काही काळ कापसाने शेतकऱ्यांना चांगले तारले पण त्यावरही आता बोंड अळी, लाल्या सह आदि रोंगाचा प्रादुर्भाव होत असून खर्च आणि उत्पन्नाचा मेळ लागत नाही. त्यामुळे यावर्षी तुरळक शेतकऱ्यांनी कापूस लागवड कमी केली. यावर्षी कापूस नसल्याने ऐतिहासिक उसळी घेतली असून १० हजारांच्या घरात भाव गेले आहेत. गेल्या वर्षी सोयाबीन ११ हजारांवर गेल्याने शेतकऱ्यांनी सोयबीनला पसंती दिली. त्यामुळे खरीप हंगामात ९० टक्के पेरा झाला. पण अतिवृष्टीमुळे अर्धे पीक हातचे गेले. राहीलेले घरात आले की, भाव गडगडले ११ हजारांवर पोचलेले सोयाबीन ६ हजार २०० ते ३०० वर रेंगाळत आहे. राज्य सरकार कर्ज माफ केल्याचे सांगत तर केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी म्हणून तीन-सहा महिन्यात खात्यावर रक्कम टाकून आम्ही कसे शेतकऱ्यांचे कैवारी आहोत हे दाखवत आहेत. पण शेतकरी सक्षम व्हावा त्यांच्या मेहनती प्रमाणे त्यांनी पिकविलेल्या पिकांना चांगला भाव मिळावा म्हणून प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस संकटात गुरफटून जातो आहे. हे असहाय झालं की, तो मृत्यूला जवळ करतोय. बीड जिल्ह्यात गतवर्षी तब्बल २१० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. या घटना ह्रदयाला पीळ पाडणाऱ्या असून यापुढे शेतकऱ्याला या वाटेवर जाण्याची गरज पडू नये असे निर्णय घेण्यात यावे अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »