बांधकाम कामगारांचे आरोग्य शिबीर संपन्न
लोकगर्जना न्यूज
केज तालुक्यातील आडस येथे सरकारी कामगार कार्यालय, आपले सरकार सेवा केंद्र आडस , लोककल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आडस, एक आधार सेवाभावी संस्था आडस यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगार यांची मोफत आरोग्य शिबिर ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलं.
महबूब पठाण यांच्या हस्ते उद्घाटन करुन शिबिर सुरू करण्यात आले. यावेळी नोंदणी कृत बांधकाम कामगार यांची मोफत आरोग्य तपासणी तसेच विविध रक्त चाचण्या करण्यात आल्या. या शिबिरामध्ये १०० हून अधिक बांधकाम कामगारांनी लाभ घेऊन रक्त तपासणी व आरोग्य तपासणी करून घेतली.
या कार्यक्रमाचे नियोजन आडस ग्रामपंचायत कार्यालय मार्फत यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. यावेळी शिवरुद्र आप्पा आकुसकर आपले सरकार केंद्राचे प्रकाश तांबवे सय्यद हज्जु , सय्यद रफिक, गोरख जोगदंड, सादिक पठाण ,संजय वाघमारे सह बांधकाम कामगार उपस्थित होते.