राजकारण

बहुजन समाज उभा राहिला डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी

बीड (प्रतिनिधी)
दि.१० : महायुतीचे बीड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांना अठरापगड जातीधर्माचा पाठिंबा मिळत आहे. बीड शहरात रविवारी (दि.१०) माळी, विरशैव लिंगायत, भावसार, कोष्टी, साळी, गवळी, लोणारी, रंगारी, बुरुड समाजबांधवांशी मेळाव्यातून डॉ.योगेश क्षीरसागर यांनी संवाद साधला.

विविध समाजाच्या बैठकीत डॉ.योगेश क्षीरसागर यांना जाहीर पाठिंबा देत मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असल्याची ग्वाही समाजबांधवांनी दिली. माळी समाजाच्या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, माजी नगराध्यक्ष बाबुराव दुधाळ, सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष किशोर राऊत, नामदेव दुधाळ, मोहनराव गोरे, सतीश शिंदे, ॲड.राजेंद्र राऊत, माजी नगरसेवक किशोर काळे, लक्ष्मण दुधाळ, नितीन साखरे यांच्यासह माळी समाजातील प्रतिष्ठित नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, विविध जातीधर्माच्या संयुक्त मेळाव्याला डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी संबोधित केले. या मेळाव्यास गवळी समाजाचे नेते तथा भाजपचे शहराध्यक्ष जगदीश गुरखुदे, दत्ता परळकर, तेली समाजाचे आदित्य पवार, रजपूत समाजाचे सूरजसिंग जयसिंग चुंगडे, माजलगावकर मठाचे प्रमुख अनिलअप्पा मिटकरी, विरशैव लिंगायत समाजाचे अशोकअप्पा चिफाडे, शिवप्रकशअप्पा कानडे, कोष्टी समाजाचे दगडूअप्पा म्हेत्रे, सुरेश आसलेकर, साळी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजू ताटे, भावसार समाजाचे प्रकाश कानगावकर, लोणारी समाजाचे अनिलअप्पा मुळेकर, बुरुड समाजाचे अर्जुन वडतिले यांच्यासह समाजाचे नेते, संघटनांचे पदाधिकारी, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परशुराम महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांचे स्वागत; वीर सावरकर प्रतिष्ठानचा पाठिंबा

वीर सावरकर सामाजिक प्रतिष्ठानच्या सर्व संस्था संचालक, हितचिंतकांची डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सदिच्छा भेट घेत सामाजिक परिस्थिती विषयांवर चर्चा केली. तसेच, परशुराम आर्थिक विकास मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष दामले यांचे स्वागत केले. यावेळी अनेक समाजबांधव उपस्थित होते. याप्रसंगी वीर सावरकर सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने डॉ.योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देण्यात आला.

बाबुराव पोटभरे यांचा मिळाला पाठिंबा

डॉ.योगेश क्षीरसागर यांनी बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोठभरे यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली. काल बाबुराव पोटभरे यांनी बीडमध्ये पक्षाची बैठक घेतली. त्यांनतर पत्रकार परिषद घेऊन जाहीर पाठिंबा दिला. या बैठकीस महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर हे देखील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »