बचत गटांच्या आधाराने महिला स्वावलंबनास गती – डॉ हनुमंत सौदागर
युसूफवडगाव शाखेत बचत गटांना कर्ज वाटप मेळावा

केज : बँकेकडून बचत गटांना होत असलेल्या कर्जाच्या अर्थसाह्य त्यातून महिलांच्या स्वावलंबनास गती येत असल्याचे मत यांनी व्यक्त केले.ते युसूफवडगाव येथील कर्ज वाटप मेळावा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
तालुक्यातील युसूफवडगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेत शुक्रवार रोजी बचत गटांसाठी कर्ज मेळाव्या चे आयोजन करण्यात आले . अकरा बचत गटांना बारा लक्ष रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले.उपस्थितांच्या हस्ते बचत गटांना मंजुरी पत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश पाटील, प्रमुख पाहुणे डॉ हनुमंत सौदागर ,शाखाधिकारी एम जे देशमाने होते.
अरे बोलताना ते म्हणाले घेतलेल्या कर्जातून गटाने उन्नती साधली पाहिजे कर्जाचा विनियोग योग्य प्रकारे झाला पाहिजे. महिलांचे संघटन कुटुंबाला बळकटी देणारे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमात बचत गटाच्या एफ एल सी आर पी रेणुका भूमकर,अनिता चोपणे यांनी मत व्यक्त करताना गटांना सन्मानाने कर्ज मिळत असल्याचे सांगितले.
बँक अधिकारी सचिन गोहोकर ,एम व्ही कांबळे, अंकुश बरदिया,श्री जाधव आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे आभार सचिन गोहोकर यांनी केले.कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.