प्रेरणादायी! लातूरच्या लेकीची आकाशाला गवसणी; अवघ्या २१ व्या वर्षी युपीएससी केली सर
लोकगर्जना न्यूज
जिद्द व चिकाटीने प्रयत्न केले असता अपयश जवळपास ही भटकत नाही याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलं असून, लातूर येथील नितिशा जगताप या २१ वर्षाच्या तरुणीने पहिल्याच प्रयत्नात युपीएससी सर करत यश संपादन केले. सर्वात लहान आयपीएस म्हणून मान मिळवत आकाशाला गवसणी घातली आहे. नक्कीच यामुळे मागासलेल्या मराठवाड्यातील तरुण, तरुणींसाठी ही घटना प्रेरणादायी अशी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
शुक्रवारीच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल घोषित झाला. यामध्ये महाराष्ट्रातील ७६१ उमेदवारांनी परिक्षा दिली. त्यातील शंभर उमेदवार यशस्वी झाले आहेत. यशस्वी झालेल्यांचा आकडा पहाता राज्यासाठी गौरवास्पद बाब आहे. युपीएससी मध्ये देशातून प्रथम येण्याचा मान बिहार राज्यातील मुलाने पटकावला तर महाराष्ट्रातून प्रथम मृणाली जोशी तर द्वितीय नरवाडे विनायक हे दोघे मानकरी ठरले. प्रथम, द्वितीय न येता ही लातूरची नितिशा चर्चेत आहे. सायकॉलॉजी विषयात पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मध्ये पदवीचे शिक्षण घेतलेल्या नितिशा जगताप हीने पुण्यात राहून युपीएससीची तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षेत पास होऊन यश संपादन केले. अनेकांना अनेक वर्षे यात घालवून ही युपीएससीत अपयशाचे धनी व्हावे लागते. परंतु लातूरच्या या तरुणीने पहेल्याच प्रयत्नात यश आले ही एक प्रेरणादायी असे यश आहे. या अतुलनीय कामगिरी बद्दल नितिशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.