प्रेरणादायी! बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूराचा मुलगा एमपीएससीत ( MPSC ) ‘या’ प्रवर्गातून राज्यात पहिला
लोकगर्जनान्यूज
बीड : ऊसतोड मजूर असलेल्या दांपत्याच्या मेहनतीचे मुलांने चीज केले असून, एमपीएससी ( MPSC ) परीक्षा सर करत एनटीडी प्रवर्गातून राज्यात प्रथम तर गुणवत्ता यादीत राज्यात 16 वा येण्याचा मान पटकावला आहे. या यशाबद्दल संतोष खाडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील खाडे कुटुंब घरात अठरा विश्वे दारिद्र्य आई-वडील ऊसतोड मजूर. पुर्ण आयुष्य त्यांनी मुलाला उभं करण्यासाठी कबाड कष्ट करण्यात घालवले परंतु मुलानेही मेहनतीचे चीज केले. एमपीएससी ( MPSC ) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचे नुकतेच निकाल समोर आले आहेत. यामध्ये ऊसतोड मजूराचा मुलगा असलेला संतोष अजिनाथ खाडे यांनी घवघवीत यश संपादन केले. एनटीडी प्रवर्गातून राज्यात प्रथम तर गुणवत्ता यादीत सोळावं येण्याचा मान पटकावला आहे. संतोष खाडे यांनी या यशाचे श्रेय आई-वडील दिले असून त्यांच्या मुळेच मी यशस्वी असल्याचे फेसबुक पोस्ट मधून म्हटले आहे.