प्रेरणादायी! बीडच्या अविनाश साबळेची चमकदार कामगिरी
३० वर्षांचा रेकॉर्ड मोडून राज्याची मान उंचावली
लोकगर्जना न्यूज
बीड जिल्ह्यातील धावपटू अविनाश साबळे याने अमेरीकेतील सॅन जुआन कॅपिस्ट्रोनोत पार पडलेल्या साऊंड रनिंग ट्रॅक मिटमध्ये चमकदार कामगिरी करून महाराष्ट्राची मान उंचावली आहे. ३० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडून यशाला गवसणी घातली.
अविनाश साबळे हा बीड जिल्ह्यातील मांडवा ( ता. आष्टी ) येथील असून अविनाशला शालेय जीवनापासून खेळाची आवड आहे. उच्च माध्यमिक शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तो लष्करात भरती झाला. यानंतर अविनाशचे कौशल्य पाहून लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्यास धावण्याच्या सर्वांसाठी खुली सूट मिळाली. यानंतर त्यांने मागे वळून पाहिले नाही. यापुर्वीही त्याने टोकीयो येथे पार पडलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात विक्रम केला. त्यावेळी अविनाशला अंतिम फेरीत पोचता आले नव्हते. यावेळी अमेरिकेत ५ हजार मीटर शर्यतीत अंतिम फेरीत पोचून विक्रम केला आहे. ३० वर्षांपूर्वी बहादुर प्रसाद यांचा विक्रम मोडीत काढला आहे. या स्पर्धेत अविनाश साबळे यांचा १२ क्रमांक आला आहे. तर स्टीपलचेस जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचणार पहिला भारतीय खेळाडू ठरला असून हा दुसरा विक्रम केला. सामान्य कुटुंबातील तरुणाने जागतिक स्पर्धेपर्यंत मजल मारली असून, ही कामगिरी म्हणजे ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.