क्राईम

प्रेम विवाहानंतर अडीच महिन्यांत थरकाप उडवणाऱ्या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ!

प्रेमीका असताना अप्सरा वाटणारी लग्न होताच पांढऱ्या पायाची म्हणून पतीने केला जाळण्याचा प्रयत्न

 

लोकगर्जना न्यूज

प्रेमीका असताना अप्सरा वाटणारी मुलगी लग्न होताच पांढऱ्या पायाची असल्याचा प्रेमवीर पतीला साक्षात्कार झाला. आयुष्यभर सोबत रहाण्याच्या आणाभाका विसरून ५ लाख बापाकडून घेऊन ये म्हणून पती,सासु, सासऱ्याने तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. प्रेम विवाह झाल्यानंतर अवघ्या अडीच महिन्यांत ही थरकाप उडवणारी घटना घडल्याचे उघडकीस येताच बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

गेवराई तालुक्यातील दिमाखवाडी येथील ही घटना असून, एकमेकांवर प्रेम जडले तेव्हा प्रेमीका असताना ती अप्सरा वाटत होती. लग्न करणार तर हिच्याशीच असे म्हणत आयुष्यभर सोबत रहाण्याच्या आणाभाका घेतल्या, परंतु कुटुंबातील व्यक्ती लग्नाला विरोध करतील म्हणून दोघेही घरातून पळून गेले. कुटुंबातील व्यक्तींनी शोधून लग्न लावून देतोत म्हणून परत आणले आणि २३ फेब्रुवारी प्रतीक्षा व अजयचे लग्न लावून दिलं. यानंतर महिनाभर चांगले सांभाळलं. यानंतर मात्र पती,सासरा, सासुने प्रतीक्षाला त्रास देण्यास सुरुवात केली. पती नेहमीच तू पांढऱ्या पायाची आहेस म्हणून मारहाण करु लागला. हुंडा म्हणून ५ लाख रुपये घेऊन ये म्हणून तीच्या मागे तगादा लावला. यासाठी नेहमी मानसिक, शारिरीक त्रास देऊ लागले. याच कारणातून शनिवारी ( दि. १४ ) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पती अजय सुरेश राजगुडे, सासरा सुरेश शहादेव राजगुडे, सासु संगीता सुरेश राजगुडे यांनी संगनमत करून प्रतीक्षाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु तीने यांच्या तावडीतून सुटका करून घेतली. ज्याच्यावर प्रेम केलं कुटुंबाला विरोध करुन लग्न केले तोच जीवावर उठल्याने प्रतीक्षाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेत विहीरीच्या दिशेने धाव घेतली. परंतु काही जणांनी आडवून आत्महत्ये पासून रोखले. यानंतर प्रतीक्षा अजय राजगुडे रा. दिमाखवाडी ( ता. गेवराई) हिने पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून पती अजय, सासरा सुरेश राजगुडे, सासु संगीता राजगुडे सर्व रा. दिमाखवाडी ( ता. गेवराई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रेम विवाह असतानाही अवघ्या अडीच महिन्यांत अशी थरकाप उडवणाऱ्या घटनेने हा प्रेम विवाहाच काय होणार? टिकणार की, तुटणार अशी चर्चा करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »