प्रा.ईश्वर मुंडे यांची पर्यावरण संवर्धन व विकास समिती,बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड
किल्ले धारूर : शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून जिल्हाभरात आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या प्रा.ईश्वर मुंडे यांच्या शिरपेचात आनखी ऐक मानाचा तुरा लागला आहे.
प्रा ईश्वर मुंडे यांचे पर्यावरण क्षेत्रात काम,सेवाभावीवृत्ती,सामाजीक क्षेत्रात काम करण्याची आवड व ईच्छाशक्ती लक्षात घेवून महाराष्ट्र राज्यभर कार्यरत असलेल्या पर्यावरण संवर्धन व विकास सिमती चे संस्थापक अध्यक्ष ॲड. डी.के.अरीकर यांनी बीड जिल्हा अध्यक्षपदी प्रा.ईश्वर मुंडे यांची निवड केली. या निवडीमुळे प्रा.ईश्वर मुंडे यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत असून सर्वजण त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देत आहेत.
ना.संजय बनसोडे राज्य मंत्री,पर्यावरण व पाणी पुरवठा,महाराष्ट्र राज्य यांनी मंत्रालय मुंबई येथील आपल्या दालनात प्रा.ईश्वर मुंडे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.