प्रकरण तापलं; आरोपीच्या अटकेसाठी मृतदेह केज पोलीस ठाण्यात
केज : मुलीचे लग्न माझ्याशी का लावून देत नाही म्हणून पित्तावर केलेल्या हल्यात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण आता चांगलेच तापले असून नातेवाईकांनी आरोपीच्या अटकेसाठी मृतदेह चक्क केज पोलीस ठाण्यात आणले आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी धाव घेतली आहे.
रस्त्यात अडवून जबर मारहाण केल्याने गंभीर जखमी असलेल्या रमेश नेहरकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच हल्ला होऊन तीन दिवस होऊन गेले तरी पोलीसांना आरोपी सापडले नाहीत. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी हल्लेखोरांना अटक करा म्हणून मृतदेह केज पोलीस ठाण्यात आणले आहे. येथे जवळपास २०० लोकांचा जमाव जमला असून, तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे परिस्थिवर लक्ष ठेवून असून ते जमावशी चर्चा करीत आहेत. परंतु जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नसून आरोपींना अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही यावर ठाम दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. नातेवाईकांशी चर्चा करत आहेत