पोलीस के हाथ लंबे होते हैं! गोळीबार प्रकरणातील आरोपी २४ तासात जेरबंद
लोकगर्जना न्यूज
तालखेड येथे ऊसतोड मजूर आनंद साजरा करताना स्कॉर्पिओ मधून आलेल्या पाचजणांनी गोळीबार केला. गोळी लागून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी ( दि. ३० ) मे सायंकाळी साडेपाच वाजता घडली. यातील एक आरोपी ग्रामस्थांनी पकडला होता. इतर आरोपींना अवघ्या २४ तासात माजलगाव ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. यामुळे पोलीस के हाथ लंबे होते हैं. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
बीडचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी मंगळवारी ( दि. ३१ ) त्यांच्या कार्यालयातील कॉन्फरन्स हॉल मध्ये पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी माहिती दिली. माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील तालखेड येथे ऊसतोड मजूर काम संपल्याने नाचत, गाणे म्हणत आनंद साजरा करत होते. यावेळी पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडीमध्ये संतोष उत्तम गायकवाड, दिलीप शिंदे व इतर तीन साथीदार आले. मजुरांना शिवीगाळ केली. शिवीगाळ का करता म्हणून समजवण्यासाठी गेलेल्या सखाराम साहेबराव जाधव गेले असता असता संतोष गायकवाड याने सखाराम यांना जिवे मारण्याचे उद्देशाने जवळ असलेल्या पिस्टल मधून फायर केला. ती गोळी लागल्याने सखाराम जखमी झाले. गोळीबार करुन पळून जात असलेल्या संतोष गायकवाड यास गावकऱ्यांनी पकडून ठेवले. साथीदार दिलीप सुधाकर शिंदे, बल्ल्या उर्फ श्रीकृष्ण सुखदेव गंधारे, सुरज उर्फ सुरेश रमेश मोरे, अशोक रमेश मोरे असे (फरार) आरोपीविरुध्द पो.स्टे. माजलगाव ग्रामीण 124/2022 कलम 307, 143, 147, 148, 149,323,504,506 भादंवि सह अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होत. संतोष उत्तम गायकवाड यास गावकऱ्यांनी पकडुन पोलीसांच्या ताब्यात दिले.
त्याकडून गुन्हयात वापरलेले एक गावठी पिस्टल व चार जिवंत काडतूस, दोन कत्त्या व एक चाकु व स्कॉर्पिओ असा मुद्देमाल जप्त केला. तसेच आरोपी नामे दिलीप सुधाकर शिंदे यास पो.स्टे. माजलगाव ग्रामीण यांनी अटक केली आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखेला फरार तीन आरोपीतांना तात्काळ अटक करण्यासाठी आदेशीत केले होते त्यावरून पो.नि.स्था.गु.शा. यांनी स्वतः घटनास्थळी भेट देवून फरार तीन आरोपीतांचा शोध सुरु केला. गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हे औरंगाबाद जिल्हयातील थेरगाव पाचोड येथे आहे. अशी माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व त्यांच्या टिमने पाचोड येथे जावून आरोपीचा थेरगाव वरून वडीगोद्री मार्गे पाठलाग करुन अंबड ते बीड रोडवरील पिटोरी सिरजगाव फाटया जवळ सापळा रचून आरोपी नामे 1) बल्ल्या उर्फ श्रीकृष्ण सुखदेव गंधारे, वय-25, रा. खंडोबा मंदिर, माजलगाव, 2) सुरज उर्फ सुरेश रमेश मोरे वय 21, रा.शिवनगाव ता. घनसांगवी जि.जालना, 3) अशोक रमेश मोरे, वय 23 रा.शिवनगाव ता. घनसांगवी जि.जालना यांना ताब्यात घेवून पो.स्टे. माजलगाव ग्रामीण येथे पुढील तपासकामी हजर करण्यात आलेले आहे. अवघ्या २४ तासात स्थानिक गुन्हे शाखा व माजलगाव ग्रामीण पोलीसांनी या घटनेचा छडा लावत ५ आरोपी व गुन्ह्यात वापरलेलं पिस्टल, वाहन व इतर साहित्य जप्त केला. या उल्लेखनीय कामगिरी बद्दल बीड पोलीसांचे अभिनंदन केले जात आहे.