पॅनकार्ड ब्लॉक झाले म्हणत व्यापाऱ्याचं खातं केल रिकामं
लोकगर्जना न्यूज
माजलगाव : कृषी सेवा केंद्र चालकाला मोबाईल वर तुमचा पॅनकार्ड ब्लॉक झालं आहे. पुन्हा अपडेट करण्यासाठी नंबर द्या असा मेसेज आला. पॅनकार्ड नंबर देताच बँक खात्यातून तब्बल ३ लाख रुपये काढून घेतले. रक्कम कटल्याचा मेसेज येताच व्यापाऱ्याला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समजलेली अधिक माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील कृषी सेवा केंद्र चालक अनिल बंडु कोळेकर यांना गुरुवारी ( दि. २५ ) एक मेसेज आला. त्यामध्ये तुमचा पॅनकार्ड ब्लॉक झाला आहे. तो पुन्हा अपडेट करण्यासाठी पॅनकार्ड नंबर द्या असा मजकूर होता. हा मेसेज वाचून अनिल यांनी कोणताही विचार न करता त्या मेसेजला रिप्लाय देत अपला पॅनकार्ड नंबर दिला. नंबर देताच काही क्षणात मोबाईलची मेसेज टोन वाजली मेसेज ओपन करताच त्यांना धक्का बसला. खात्यातील थोडे थोडके नव्हे तर तब्बल तीन लाख रूपये कटले होते. पैसे कटताच फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यावरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.