जबरदस्तीने गर्भपात! मातेच्या तक्रारीवरून पती,सासु व डॉक्टर सह चौघांवर गुन्हा दाखल
लोकगर्जना न्यूज
परळी : मागे परळी येथील डॉ. मुंडे गर्भपात प्रकरण देशभरात गाजलं आहे. येथून पुन्हा गर्भपात प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. जबरदस्तीने एका डॉक्टरला हाताशी धरून केले गेले आहे. याप्रकरणी पिडीत मातेच्या तक्रारीवरून पती,सासु, डॉक्टर व अन्य एक असे चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समजलेली अधिक माहिती अशी की, पिडीत महिलेला पहिली एक मुलगी आहे. यानंतर ती दुसऱ्याने गर्भवती आहे. त्यामुळे यावेळी मुलगाच हवा असा कुटुंबाचा अट्टाहास आहे. यातून पती, सासु आणि अन्य एक व्यक्ती यांनी एका डॉक्टरला हाताशी धरून घरी बोलावून घेऊन नियमबाह्य गर्भलिंगनिदान करण्यासाठी सोनोग्राफी केली. संबंधित डॉक्टरने मुलगी असल्याचे सांगितले. दुसरीही मुलगी नको म्हणून पती, सासुने गर्भपात करण्यासाठी पिडीतेवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. तरीही तीने मुलगा असो की, मुलगी मला हवी आहे असे ठामपणे सांगितले. यानंतर ती आजारी पडली उपचारासाठी त्याच सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरला बोलावून घेतले व उपचाराचा बनाव करत तीला न सांगता गर्भपाताचे इंजेक्शन दिले. यानंतर गर्भवती महिलेला पोट दुखीचा त्रास सुरू झाला. आता गर्भपात करावाचं लागतो म्हणून ती माझ्या बाळाला नका मारु! असा टाहो फोडत असतानाही पती, सासु, डॉक्टर यांनी जबरदस्तीने गर्भपात केला. यावेळी डॉक्टराने चक्क गर्भाशय फाडूनच गर्भाचे तुकडे -तुकडे करुन बाहेर काढले. त्याची विल्हेवाट लावली. अशा आशयाची फिर्याद पिडित माता सरस्वती नारायण वाघमोडे रा. शिवाजी नगर परळी यांनी दिली. त्यावरून पती नारायण वाघमोडे, सासू छाया वाघमोडे, डॉ. स्वीमी ( पुर्ण नाव समजले नाही), प्रकाश कावळे या चौघां विरुद्ध विविध कलमानुसार संभाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.