पुण्यात भरदिवसा गोल्ड मॅनची हत्या

पुणे – शहरातील चंद्रभागा चौकात भरदिवसा तरुणावर गोळ्या झाडून हत्या करण्यात अल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेतील मृत तरुणावर ६ गोळ्या घातल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. समीर मनूर(वय 40 )असं मयताचे नाव आहे. तो गोल्ड मॅन म्हणून प्रसिद्ध असल्याचं सांगितलं जात आहे.
शहारातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हददीतील चंद्रभागा चौकात हा गुन्हा घडला आहे. मयत समीर चौकात उभा असताना दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी गोळीबार केला. अत्यंत जवळून समीर यांच्यावर वर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळाबारात गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटना स्थळावर हजर झाले. तोपर्यंत हल्लेखोर तेथून पसार झाले होते. भरदुपारी घडलेले या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.