पुढे मृत्यू उभा होता! लवकर घरी जाण्यासाठी मागितली लिफ्ट थोडं पुढे जाताच अपघातात ठार
लोकगर्जनान्यूज
आष्टी : टँकर अन् दुचाकीची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या भीषण अपघात दुचाकीवरील दोघेही ठार झाल्याची घटना आष्टी तालुक्यात बीड-अहमदनगर महामार्गावर रविवारी सायंकाळी घडली आहे. यातील एकाने तर लवकर घरी पोचता येईल म्हणून दुचाकीस्वारास हात करुन लिफ्ट मागितली अन् काही अंतरावर जाताच अपघात घडून तो कायमचाच कुटुंबापासून दूर गेला.
विठ्ठल ( प्रमोद ) अनिल तरटे रा. डोईठाणा ता. आष्टी, महादेव गायकवाड रा. साकुंडी ( ता. पाटोदा ) असे अपघातातील मयतांची नावं आहेत. महादेव गायकवाड हे कडा येथून आपले काम उरकून स्वतःच्या दुचाकीवरू धामणगाव मार्गे आपल्या गावाकडे परत जात होते. दरम्यान ते धामणगाव येथे आले असता विठ्ठल तरटे हा वाहनाची वाट पहात उभा होता. वाहन येत नसल्याने लवकर घरी पोचण्यासाठी तरटेने दुचाकीला हात करुन लिफ्ट मागितली. त्यानेही लिफ्ट दिली. परंतु विठ्ठल तरटेला काय माहित की, पुढे मृत्यू त्याची वाट पाहत आहे. थोड्या अंतरावर जातात समोरुन येत असलेला इंधन वाहतूक करणारा टँकर क्र. MH 16 CC 7631 दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिली. धडक बसताचा दुचाकीवरील दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले अन् जागीच ठार झाल्याची घटना बीड-अहमदनगर महामार्गावर सांगवी पाटण ते डोईठाण दरम्यान शिवनेरी चौकात घडली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. अपघात घडताच टँकर चालक फरार झाला होता पण पोलीसांनी पाठलाग करुन टँकर सह चालकाला ताब्यात घेतले. ऐन होळीच्या सणा दिवशीच अपघात घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. तर महादेव गायकवाड हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमवते व्यक्ती होते त्यांचे अपघाती निधन झाल्याने कुटुंब उघड्यावर आलं.